शुक्ल यजुर्वेदीयमाध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ,
II श्री याज्ञावाल्क्यो विजयतेii II
“शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ“ ही संस्था आपल्या समाजासाठी सन १९४० पासून आज मार्च २०२२ पर्यंत गेली सतत ८२ वर्ष विविध उपक्रमांद्वारे कार्य करीत आहे. संस्थेच्या या कार्यासाठी आपले ज्ञाती बांधवही सहकार्य करीत आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नारायण पेठेत केसरी वाड्याजवळ सुमारे १५५० चौरस फुटाचे अद्ययावत कार्यालय असून तेथेच संस्थेची सुमारे १४,००० चौरस फूट बांधकाम असलेली तीन माजली इमारत आहे.
संस्थेचे विद्यमान विश्वस्त मंडळ
| 1 | श्री. उमाकांत पुरुषोत्तम जोशी | अकोला | अध्यक्ष |
| 2 | श्री. सुहास गोपाळ शुक्ल | नाशिक | उपाध्यक्ष |
| 3 | श्री. विश्राम रघुनाथ कुलकर्णी | पुणे | कार्याध्यक्ष |
| 4 | श्री. गजानन पंढरीनाथ बीडकर | पंढरपूर | सहकार्याध्यक्ष |
| 5 | श्री. मुकुंद विष्णू वाडेकर | पुणे | कार्यवाह |
| 6 | श्री. दिलीप सोमनाथ संभूस | पुणे | कोषाध्यक्ष |
| 7 | श्री. नरेश श्रीपाद भसे | पुणे | सहकोषाध्यक्ष |
| 8 | श्री. बाळकृष्ण शंकर वाडेकर | पुणे | विश्वस्त |
| 9 | श्री. विलास नारायण देशपांडे, | डोंबिवली | विश्वस्त |
| 10 | श्री. हिमांशू श्रीराम संगमनेरकर | बडोदा | विश्वस्त |
| 11 | श्री. दिगंबर नारायण जोशी | अहमदनगर | विश्वस्त |
| 12 | श्री. सुधाकर माधव दोखणे | दादर मुंबई | विश्वस्त |
माहे मार्च २०२२ अखेर संस्थेकडे असलेल्या निधीची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
| विश्वस्त निधी | रु. ३२.०० लाख | इमारत निधी | रु. ६४.०० लाख |
| दत्तक योजना निधी (शैक्षणिक) | रु. ७३.९६ लाख | पारितोषिक निधी (शैक्षणिक) | रु. ६.०० लाख |
| वेदविद्या संवर्धन निधी | रु. ६.२० लाख | छात्र भोजन निधी | रु. ३.६७ लाख |
| पुरस्कार निधी | रु. ७.४९ लाख | संकल्प निधी | रु. १२.६० लाख |
शिखर संस्थेची भूमिका पार पडत असताना संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संस्थेतर्फे खालील प्रमाणे विविध उपक्रम राबवले जातात.
- १) वसतिगृह -
- २) अभ्यासिका -
- ३) दत्तक योजना (परतफेड शिष्यवृत्ती) -
- ४) पारितोषिक योजना -
- ५) वेदविद्या संवर्धन -
- ६) छात्र भोजन निधी -
- ७) अतिथी गृह –
पुण्याबाहेरील ब्राह्मण विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याचा विचार करून पुण्याच्या मध्यवस्तीत नारायण पेठेत संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीत कै. त्रिंबक मार्तण्ड केंघे विद्यार्थी वसतिगृह चालवले जाते. यासाठी अत्यंत अल्प दर आकारला जातो. यामध्ये प्रत्येक खोलीत कॉट, वीज, पंखा, अभ्यासासाठी टेबल, खुर्ची, स्नानासाठी गरम पाणी, स्वतंत्र अभ्यासिका इत्यादी सोयी पुरवल्या जातात. या वसतिगृहात सुमारे ६० विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी त्याच इमारतीत घरगुती स्वरूपातील सात्विक भोजनाचीही सोय करण्यात आली आहे.
आपल्या वसतिगृहातील तसेच पुण्यातील ज्या ब्राह्मण विध्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध नाही त्यांचेसाठी कै. सुमन दिगंबर वाडेकर अभ्यासिका चालविली जाते.
संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राशेजारील राज्यांमधील ब्राह्मण विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरच्या शिक्षणासाठी या दत्तक योजने अंतर्गत परतफेड शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने त्यास मिळालेली शिष्यवृत्तीची रक्कम परत करावयाची असते यासाठी कोणत्याही प्रकारचा व्याजाची आकारणी संस्थेकडून केली जात नाही.
सदर योजनेचा उद्देश हा आपल्या समाजातील व्यक्तीने देणगी स्वरूपात रक्कम देऊन त्यारकमेवरील मिळणाऱ्या व्याजातून एका विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी मदत करणे हा आहे. म्हणजेच थोडक्यात एखाद्या देणगीदाराने रु. १०,०००/- देणगी दिल्यास सदर रक्कम संस्थेतर्फे मुदत ठेवीत गुंतवली जाते. त्यावर साधारण प्रमाणे आजच्या व्याजाच्या द.सा.द.शे. ६% या दराने येणारे व्याज रु. ६००/- विद्यार्थ्यांला परतफेड शिष्यवृत्ती स्वरूपात दिले जातात. या प्रकारे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीधारक विध्यार्थ्याला कोणत्या देणगीदाराच्या व्याजातून त्यास किती रक्कम दिली आहे हे दरवेळी कळविले जाते. तसेच ही सर्व माहिती संस्थेच्या ‘याज्ञवल्क्य परिवार‘ या मासिकात दिली जाते. सदर योजनेसाठी आतापर्यंत रु. ७३.९६ लाख रुपयाच्या देणग्या संस्थेस प्राप्त झाल्या आहेत. शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी परत केलेली रक्कम परत अन्य विद्यार्थ्यांना दिली जाते. सन २०२१-२२ वर्षात संपूर्ण महाराष्ट्र व त्या बाहेरील विद्यार्थ्यांना एकूण रु. —————-/- शिष्यवृत्ती रूपाने देण्यात आली आहे.
ब्राह्मण विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्यावर त्यांचे आपल्याच समाजाकडून कौतुक व्हावे या उद्देशाने १० वी., १२ वी व त्यानंतरच्या विद्यार्थ्यांना जिल्हानिहाय केलेल्या अर्जदार विद्यार्थ्यातून पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी पहिले रु. १५००, दुसरे रु.१००० व उत्तेजनार्थ रु.५०० अशी पारितोषिके सन २०२१-२२ मध्ये दिलेली आहेत. सदर योजनेसाठी आतापर्यंत रु. ६.०० लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली असून त्याच्या व्याजातून ही पारितोषिके दिली जातात.
पुरातन काळापासून आपल्या वेदांचा अभ्यास करून त्याचे संवर्धन ब्राह्मण समाज करीत आला आहे. त्यास प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने वेदविद्या संवर्धनासाठी झटणाऱ्या ब्राह्मण संस्थाना या उपक्रमाद्वारे मदत केली जाते. यात प्रामुख्याने पारंगत, मान्यवर वेदमूर्तीचा सत्कार, वैदिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास त्याच्या शैक्षणिक कार्यकाळासाठी अनुदान देणे, वेदाभ्यासीना प्रोत्साहनपर पारितोषिक देणे, तसेच पुरातन ग्रंथांचे, पोथ्यांचे संगोपन व पुनर्मुद्रण करण्यासाठी सहाय्य करणे, वेदविषयक व्याख्यानांचे आयोजन करणे, वेदांच्या भाषांतरासाठी साहाय्य करणे इत्यादींचा समावेश होतो
या उपक्रमाअंतर्गत वेदाचार्य पुरस्कार, घनपाठी पुरस्कार, वैदिक अध्यापक पुरस्कार, आदर्श वैदिक पाठशाळा पुरस्कार, यजुर्वेद संहिता मुखोद्गत करणाऱ्या वैदिक छात्रांसाठी छात्र पुरस्कार असे विविध पुरस्कार दिले जातात. यासाठी स्वतंत्र समिती गठीत केली आहे. त्या समितीत या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा समावेश केलेला आहे.
या उपक्रमासाठी आतापर्यन्त रु. ६.२० लाख रुपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या असून त्यावरील व्याजाचा विनियोग वरील पुरस्कारासाठी केला जातो.
समाजातील मान्यवरांना त्यांच्या नातलगांच्या प्रित्यर्थ अन्नदानासाठी काही रक्कम द्यावयाची असते. त्या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत प्राप्त झालेल्या देणगीवरील व्याजातून विविध वेदपाठशाळाना छात्र भोजन साठी मदत केली जाते. आतापर्यंत या उपक्रमासाठी संस्थेस एकूण रु. ३.६७ लाख देणगी प्राप्त झाली आहे.
परगावहून अल्प कालावधीसाठी पुण्यात येणाऱ्या सामाजीतील व्यक्तीसाठी संस्थेच्या वास्तुत कै.सिंधुताई त्रिंबक केंघे अतिथी गृह अत्यंत अल्प दारात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) (YUVA) –
२००४ साली पंढरपूर अधिवेशनात हा उपक्रम चालू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. पहिली चार वर्षे या उपक्रमासाठी कार्यकर्ते गोळा करणे व त्यांचे एकमेकात बॉंडिंग निर्माण करण्यात गेली. असे धडाडीचे चाळीस कार्यकर्ते जेव्हा युवाच्या मागे उभे राहिले तेव्हा २००८ सालापासून दर महिन्याला मंथली मीट हा उपक्रम सुरु झाला व तो अव्याहतपणे सुरू आहे.
युवा महिला आघाडी ची स्थापना माननीय डॉ सौ मेधाताई विश्राम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आज पर्यंत युवाने अनेक नवनवीन उपक्रम हाती घेऊन ते अतिशय यशस्वीरित्या पार पाडून दाखवले आहेत. त्यातील उल्लेखनीय उपक्रम म्हणजे युवाकॉन ही इंटरनॅशनल बिझनेस कॉन्फरन्स. युवाने आजपर्यंत परदेशात दुबई व मॉरिशस येथे या कॉन्फरन्स झाल्या आहेत. युवा व्यावसायिकांनी या उपक्रमांद्वारे आज पर्यंत किमान पाचशे कोटींचा व्यवसाय केला आहे. फक्त दुबई कॉन्फरन्समध्ये यापैकी ६८ कोटींचा व्यवसाय झाला आहे.
युवा तर्फे दर वर्षी नामवंत व्यवसायिक व कलाकार यांना युवा वर्धापन दिनाचे औचित्य साधून चंद्रकांत जोशी स्मृतीप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार तसेच सुजन आर्ट गॅलरी पुरस्कृत युवा कलाकार पुरस्कार देण्यात येतात. व्यावसायिकांना व्यवसायासाठी लागणारे मार्गदर्शन तसेच आपल्या समाजातील गरजू तरुणांना या व्यवसायाकडे नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देणे हेही काम सदैव चालू असते. श्री उदय निरगुडकर, श्री रवींद्र प्रभुदेसाई, श्री जितेंद्र जोशी, श्री सचिन कुलकर्णी अशा नामवंत उद्योजकांबरोबर करोना काळात सुद्धा या प्रसंगी कसा मार्ग काढावा यासाठी अनेक सेशन्स घेण्यात आली.
युवा महिला आघाडीने महिलांसाठी अनेक व्यावसायिक प्रदर्शने भरवणे तसेच पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियट येथे दोन बिझनेस कॉन्फरन्स आयोजित करणे असे अनेक उपक्रम केले आहेत. ‘युवा’ ची फी तीन वर्षासाठी फक्त रुपये पाच हजार नऊशे (रु. ५,९००/-) आहे.
कात्यायनी वधू-वर केंद्र
२००७ साली कात्यायनी वधू-वर केंद्राची स्थापना झाली. कात्यायनी वधू-वर केंद्रात नोंदणी केलेल्या वाढू/वरांची माहिती याज्ञवल्क्य परिवारच्या मासिकात दिली जाते. नोंदणी धारकाला याज्ञवल्क्य परिवारचे पुढील १२ अंक पाठवले जातात. त्याबरोबरच वधूवर केंद्रातील वधू-वरांची सर्व माहिती पुढील एक वर्षभर संस्थेच्या www.katyayani-vivah.com या वेबसाईट द्वारे पाहता येते. आजपर्यंत कात्यायनी विवाह संस्थेत साधारण १२००० ते १५००० स्थळे नोंदवली गेली असून त्यातून साधारण महिन्याला ४ ते ५ विवाह (म्हणजे ७५० विवाह) आता पर्यंत जमले आहेत.
२०१० पासून दर वर्षी कात्यायनी आणि स्वाती वधू-वर केंद्र याचे तर्फे वधू-वरांसाठी मेळावे घेण्यात येतात. यात उच्चशिक्षित, प्रथम वधू-वर यांचा समावेश असतो. तसेच अल्प शिक्षितांसाठीही स्वतंत्र मेळावे घेतले जातात. २०१९ मध्ये व्यंग, अंध, अपंगांसाठी विनामुल्य मेळावा घेतला होता. त्यातूनही ४ ते ५ विवाह जमले आहेत. २०१० पासून आपण घटस्फोटीत, विधवा, विधूर, याच्यासाठी मासिक मेळावे घेत आहोत व त्यास चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४५० ते ५०० घटस्फोटीतांची नोंदणी झाली असून त्यातील ५० ते ५५ विवाह जमले आहेत. संस्थेकडून समुपदेशनाचे काम सौ. अनघा भावे या करतात. सामाजिक बांधिलकी जपताना विवाह ठरवण्यासाठी जी मध्यस्थाची भूमिका असते ती सुद्धा आपल्या संस्थेतर्फे जेष्ठ समाजसेवक व संस्थेचे सभासद श्री. का. भा. कुलकर्णी हे उत्तम प्रकारे पार पडतात. तर स्वाती वधू-वर केंद्राच्या सौ. स्वाती संभूस या संस्थेसाठी विनामूल्य मार्गदर्शन व स्वतः स्थळ सुचवून लग्न जमवण्याचे कार्य करतात. नुकताच संस्थेतर्फे वधू-वर मेळावा संपन्न झाला. त्यात बरेच थेट संपर्क झाले.
प्रकाशने –
* याज्ञवल्क्य परिवार मासिक – संस्थेच्या कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी दरमहा याज्ञवल्क्य परिवार हे मासिक प्रसिद्ध केले जाते. ते संस्थेचे सभासद, देणगीदार, हितचिंतक, वधू-वर अशा एकूण सुमारे ४००० जणांना वितरीत केले जाते. रंगीत मुखपृष्ठ, उत्तम कागद व मोहोरेदार छपाई या बाह्य वैशिष्ट्यांनी सज्जीत या मासिकात संलग्न संस्थांचे वृत्त, समारंभ व उपक्रमांची माहिती, वधू-वरांची विस्तृत सूची, अहवाल, निवेदने, देणगीदारांची नावे, अभिनंदनीय व्यक्तींचा परिचय, शोक समाचार इत्यादींचा अंतर्भाव असतो.
* ज्ञानेश्वर त्रैमासिक –दरवर्षी माहे मे, ऑगस्ट, नोव्हेंबर व फेब्रुवारी मध्ये ‘ज्ञानेश्वर त्रैमासिक’ प्रकशित गोटे. त्याच्या सुमारे ४५०० प्रती वितरीत केल्या जातात. ‘ज्ञानेश्वर त्रैमासिक’ हे लेखक, अभ्यासक, जिज्ञासू व चोखंदळ वाचकांकडून अभिनंदनीय ठरले आहे. तत्वज्ञ व विचारवंताच्या धर्म, समाजकारण, संत साहित्य इ. संबंधित वैचारिक व संशोधनात्मक लेखांचा त्यात अंतर्भाव असतो.
* इतर प्रकाशने –संस्थेतर्फे पाटील निधीन्यासाच्या मदतीने नित्य ब्रह्मकर्म समुच्चय, तसेच ज्ञानेश प्रकाशन-नागपूर यांच्या सहकार्याने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत याज्ञवल्क्य चरित्र, माध्यंदिन यजुर्वेदीय ब्राह्मणांची गोत्रावळी, भाद्रपद मास, सण, पूजा व कहाण्या व इतरही धार्मिक पुस्तके प्रकाशित केली आहेत.
पुरस्कार –
* युवा उद्योजक पुरस्कार – उद्योजकाचे कौतुक करण्यासाठी, त्यांना दाद देण्यासाठी, नवीन उद्योजकांना स्फूर्ती लाभावी म्हणून युवा वर्धापन दिनाच्या निमित्ताने कै. चंद्रकांत जोशी स्मृती प्रीत्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
* युवा उद्योजिका पुरस्कार – महिला दिनाच्या दिवशी एका उद्योजिकेला ‘युवा उद्योजिका पुरस्कार देऊन’ गौरविण्यात येते.
* उद्योजक पुरस्कार – स्वकर्तुत्वाने यशाचे उच्च शिखर गाठणाऱ्या उद्योजकांची थोरवी लक्षात घेऊन त्यांचा आदर्श तरुणापुढे राहावा व युवा पिढीने उद्योग-व्यवसायाकडे प्रवृत्त व्हावे म्हणून अशा नामांकित उद्योजकाला हा पुरस्कार दिला जातो.
* स्वयंसिद्धा पुरस्कार – शून्यातून सुरुवात करून उद्योग जगतात स्वतःला सिद्ध केलेल्या महिला उद्योजीकेला कै. सावित्रीबाई नारायण जोशी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
* आदर्श गुरु सन्मान पुरस्कार –समाजातील भावी पिढीस आपल्या अध्यापनाने आदर्श रूप घडविणाऱ्या गुरूजनांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कै. गुरुनाथ शहाडे यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
* आदर्श कार्यकर्ता पुरस्कार – समाजसेवेची आवड असलेल्या व कार्यकर्ता म्हणून भरीव काम करण्यास कै. दि. स. कर्जतकर याच्या स्मरणार्थ या पुरस्काराने गौरविले जाते.
* सेवारत्न पुरस्कार – समाजाची अविरत सेवा करणाऱ्या व्यक्तीस कै. रत्नमाला गजानन जोशी स्मृत्यर्त डॉ. भाग्यश्री काळे-पाटसकर पुरस्कृत ‘सेवारत्न पुरस्कार’ दिला जातो.
याज्ञवल्क्य नागरी सहकारी पतसंस्था –
दिनांक २० ऑगस्ट २००० रोजी नाशिक येथे भरलेल्या सर्वसाधारण सभेत स्वशाखीयांच्या हितासाठी पतसंस्था काढावी असा ठराव होऊन (श्री. शशिकांत पत्की यांच्या बँकिंग व सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांची मुख्य प्रवर्तक म्हणून नेमणूक केली गेली.) सहकारी कायद्याचे अधीन व त्यास अनुसरून मार्च २००१ पासून मध्यवर्ती मंडळाची संल्गन असणारी परंतु स्वतंत्रपणे कार्य करणारी पतसंस्था स्थापन करण्यात आली. त्यांनंतर कोथरूड व पिंपरी-चिंचवड येथेही पतसंस्थेच्या शाखा चालू करण्यात आल्या आहेत. उभारणीपासून वाढीपर्यंतच्या गेल्या दहाहून अधिक वर्षाच्या काळात ब्राह्मण समाजातील या क्षेत्रातील धुरिणांचे, तत्ज्ञांचे व अनुभवी लोकांचे सहकार्य या संस्थेला लाभले असून पतसंस्थेचे संगणकीकृत स्वतंत्र असे सुसज्ज मध्यवर्ती कार्यालय नारायण पेठेत आहे. पतसंस्थेला ऑडीटमध्ये अ वर्ग मिळालेला आहे.